Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

दगडाला सोन्याची नाणी तर नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई : फडणवीस

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरुन राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलआक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा आहे. आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. आम्ही संघर्ष सुरु केला आहे आणि जोपर्यंत संभाजीनगरमध्ये पाणी पोहचत नाही. तोपर्यंत सरकारला रात्री स्वस्थ झोपू देणार नाही. असा निर्धात त्यांनी बोलून दाखवला.

आपल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगितले की पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. ते म्हणतात मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचे आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेष आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है, हलख में प्यास है और आंखों में पाणी है, ऊपरवाले तेरे से कोई गिला नही है ये तो निचेवाले तेरे बंदो की बेईमानी आहे, असा निशाणाही फडणवीसांनी शायरीतून शिवसेनेवर साधला.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha