devendra fadnavis uddhav thackeray Team Lokshahi
राजकारण

Devendra Fadnavis | 'मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले तर तुम्हाला पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागेल'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात एक अक्षरही बोलले तरी तुम्हाला किमान पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागेल, पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हीच परंपरा आता महाराष्ट्र सरकारने कायम केली आहे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सामनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारला मसणात जावे लागेल, या टिकेला दिले. ते नागपुरात माध्यामांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना राणा यांनी शनी म्हंटले याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण काय बोलते तो त्यांचा प्रश्न आहे. पण, सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर करावा. तर महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की मुख्यमंत्र्यांविरोधात एक अक्षरही बोलले तरी तुम्हाला किमान पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागेल. पण, पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हीच परंपरा आता महाराष्ट्र सरकारने कायम केली आहे, असा निशाणा फडणवीसांनी ठाकरे सरकारवर साधला आहे.

ते पुढे म्हणाले, कुणी हनुमान चलिसा पठण करत असेल तर चांगलंच आहे. कोणालाही त्यापासून रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचेच आहे. तर भारतात, महाराष्ट्र किंवा नागपूरमध्येही हनुमान चालिसावर कोणीही बंदी घालू शकत नाही. त्यामुळे हनुमान चालीसा यासंदर्भात राजकारण करण्याचे काम नाही. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहेत.

नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्रातील पोलिसांना संसदेच्या प्रिव्हीलेज कमिटीने बोलावले आहे. यासंदर्भात फडणवीस बोलताना म्हणाले की, अधिकाऱ्यांना संसदीय समितीने बोलावले आहे. तो प्रिव्हीलेज समितीचा अधिकार आहे, असे मला वाटते. कोणतीही तक्रार असेल तर त्यासंदर्भात कमिटी बोलावत असते. ते नेमकं काय करणार आहे मी सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल