राजकारण

त्यांचे सरकार त्यांच्या घरी; फडणवीसांची जोरदार टोलेबाजी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईतील लहान मुलांसाठी किलबिलाट ॲम्बुलन्स तयार करण्यात आलेली आहे. याचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फडणवीसांनी ठाकरे गटावर टोलेबाजी केली आहे. आमचे सरकार आपल्या दारी आहे. त्यांचे सरकार त्यांच्या घरी आहे, असा निशाणा फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

राज्यात प्रथमच किलबिलाट रुग्णवाहिका सुरु होणार आहे. मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका सुरु होतेय. रस्त्यावर असलेली मुले सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

पंप स्टोरेज हा जगात सर्वात अपारंपरिक स्त्रोत म्हणून स्वीकारला गेला आहे. आज राज्यात पंप स्टोरेज संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅट करार केले. केंद्र सरकार व खाजगी कंपन्यांसोबत हे करार केले होते. ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे ३० हजारांहून अधिक रोजगार निर्माण होतील. केंद्राने वारंवार सांगितले आहे की रिन्युअल एनर्जीमध्ये जलविद्युत ही व्यवस्था आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

कालच एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. २०२०-२१ मध्ये गुजरात तर २१-२२ मध्ये कर्नाटक नंबर वनवर गेला. आता महाराष्ट्र नंबर वन गेला आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले हे बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली आहेत, असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.

संभाजी नगरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत शेवटच्या खुर्चीवर कॅमेरे ठेवा. पण एकही माणूस उठला नाही. आमचे सरकार आपल्या दारी आहे. त्यांचे सरकार त्यांच्या घरी आहे, असा निशाणाही फडणवीसांनी महाविकास आघाडीवर साधला आहे.

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले