पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही काही जणांचे तोंड सुरु आहेत. राजाचा आवडता पोपट जसा मेला तस उद्धव जी यांना पोपट मेला अस कुणी सांगतच नाहीय. उध्दव ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे, असे जोरदार टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर सोडले आहे. भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक आज पुण्यात पार पडत आहे. यावेळी ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून आठ मागण्या होत्या, त्यातील एकही मागणी मान्य केली नाही. आणि उद्धव ठाकरे म्हणातात जा गावोगावी आणि आपला निर्णय सांगा, जा बडवा. परंतु, तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. आता पोपट मेला आहे. हे सरकार पूर्णपणे बहुमत आणि कायदेशीर आहे. आणि पुढील आपला कार्यकाळ पूर्ण करणार आणि पुन्हा निवडून येणार हा शब्द आहे. लोकसभेला आपण २५ जागा जिंकून आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
कर्नाटकात आपला पराभव झाल्यानंतर अनेक जणांना उकळ्या फुटल्या. आपल्याच घरी मुलगा जन्माला अस काही जण वागले. ज्यांचा एक ही उमेदवार जिंकला नाही ते आनंद साजरा करु लागले आहेत. आता हे म्हणातत कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. तुम्ही कितीही लांगुनचलन करा. तुमचा कर्नाटक पॅटर्न इथे चालणार नाही. इथे फक्त मोदी पॅटर्न, फक्त भाजप पॅटर्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पॅटर्न चालतो, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
नाना पटोले यांना तर अवॉर्ड दिला पाहिजे. ते, म्हणाले अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब मी ठेवले. मलाही असं वाटायलं लागलं की, असं म्हणावं २६/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. नाना भाऊ माझा खरा मित्र आहे, असा निशाणाही फडणवीसांनी नाना पटोलेंवर साधला आहे. सचिन वाझेंना पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला वारंवार सांगितले. पणं मी केले नाही. पणं, त्यांचं सरकार आल्यावर त्याला पुन्हा घेतले, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, २०२३ चे शेवटचे सहा महिने आणि २०२४ चे पहिले सहा महिने आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगत फडणवीसांनी पुन्हा एकदा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, कोणतीही लालसा मनात न बाळगता भाजपसाठी वेळ आपल्याला द्यायचा आहे. नवभारतासाठी मोदी यांना आपली साथ द्यायची आहे. पुढच्या एक वर्षात कुणाला काही मिळणार नाही? अध्यक्ष, समिती मागू नका, मंत्रीपद मागू नका. आपण मंत्रिमंडळ विस्तार करु, असेही त्यांनी म्हंटले आहे