devendra fadnavis governor : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आमदार उद्या मुंबईण्यात येची चर्चा असताना काही वेळापूर्वीच अचानक भाजपा (BJP) नेते सागर बंगल्यावरून थेट राजभवनाकडे (Raj Bhavan) गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीत फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले. आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. (devendra fadnavis and bjp leader reached raj bhavan to meet governor bhagat singh koshyari)
त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अजून काही भाजप नेते आहेत. त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षात आता भाजप आणि राज्यपालांची अधिकृत एन्ट्री झाल्याचंच पाहायला मिळत आहे. शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि 10 आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी दिला होता. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजपा नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. येत्या 30 तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा, अशी मागणी हे भाजपा नेते करणार आहेत. यामध्ये फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत.