Devendra Fadnavis  Team Lokshahi
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशानंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ग्रामीण जनतेने...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचं सरकार हे अशाचप्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभा राहील व त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल.

Published by : Sagar Pradhan

राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या जल्लोष संपूर्ण राज्यभरात सध्या होताना दिसत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा आतापर्यंत जिंकल्या आहे. याच निवडणुकीत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार भाजपा आणि शिंदे गटाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे दिसत असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे. आतापर्यंतचे जे आकडे आलेले आहेत, त्यानुसार ३ हजार २९ एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये मग तो विदर्भ, मराठवाडा असो की, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असेल सगळीकडे आमची सरशी झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करेन, की या सहा महिन्यांच्या कारभारावर एकप्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे.

मी त्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचही अभिनंदन करेन, की त्यांनीही अविरत प्रयत्न करून भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी एक वातावरण तयार केलं. त्यामुळे जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते, स्वत: बेकायदेशीर असताना आमच्या सरकारला बेकायदेशीर म्हणत होते, त्यांना न्यायालयाने तर सांगितलंच आहे की आमचं सरकार कायदेशीर आहे. पण आज महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील सांगितलं, की हेच कायदेशीर सरकार आहे आणि ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी पसंती आम्हाला दिली आणि त्यांना आश्वास्त करू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचं सरकार हे अशाचप्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभा राहील व त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल. मी पुन्हा एकदा आभार मानतो.” असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु