Deepali Sayed : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे- फडणवीस सरकार उदयास आले. परंतु, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट शिवसेनेत निर्माण झाले आहे. यामुळे शिवसेना नक्की कोणाची असा वाद सध्या निर्माण झाला आहे. हा वाद आता कोर्टाच्या दरबारात आहे. परंतु, बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोप होत असताना दिपाली सय्यद यांच्याकडून शिंदे -ठाकरे यांच्या समेट घडावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत त्यांनी शुभेच्छा देताना ठाकरे- शिंदे यांना एकत्र येण्याची विनंती केली आहे.
काय दिल्या दिपाली सय्यद यांनी शुभेच्छा ?
आज सर्वत्र रक्षाबंधन साजरा केला जात आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे व शिंदे यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, शिवबंधन आजही सर्व शिवसैनिकांच्या हातात आहे. धागा कितीही साधा असला तरी आपले शिवसेना परिवाराचे नाते हे अतुट आहे. झाल्या असतील चुका कित्येक पटीने सर्व माफ करून एकत्र यावे हिच रक्षाबंधनानिमित्त मंगलमय शुभेच्छा! अशी शुभेच्छा वजा विनंती दिपाली सय्यद यांनी केली.