मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या (Money Laundering) आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिकांचे (Nawab Malik) डी-गँगशी संबंध होते. तसेच, मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यावर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तर त्यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद?
ज्यांचे संबंध दाऊदशी (dawood) त्यांच्या बरोबर आपले शेठजी बिर्याणी खाऊन आले. दाऊदला भारतात आणू, अशी घोषणा देऊन सरकारमध्ये आले आहेत. चिरीट तोम्मया बापाने माती खाली म्हणून गावावर नाव ठेवणे हे बरे नव्हे, अशा शब्दांत दीपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांना सुनावले आहे.
न्यायालयाच्या निरीक्षणानंतर किरीट सोमय्यांनी ट्विट करत म्हणाले, दाऊद गँग आणि मलिक यांचे संबंध आहेत, असे न्यायालयाने सांगितले. आणि नवाब मलिक हे उद्धव ठाकरे यांचे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) आहेत. वाह रे ठाकरे सरकार, अशी टीका त्यांनी केली होती.
कुर्लास्थित गोवावाला कंपाउंड जमीन प्रकरणात (Kurla Property Deal) मनी लाँडरिंग आणि गुन्हेगारीमध्ये नवाब मलिक सामिल होते, यासाठी मलिकांनी हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत बैठका झाल्या, असेही न्यायालयाने म्हंटले आहे