मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर मसणात जा, त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येते. यामध्ये शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayad) यांनी भाजपवर त्याच भाषेत टीका केली आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा, वाढती महागाई, दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या, असे ट्विट त्यांनी केले आहे.
याशिवाय, मंत्री यशोमती ठाकूर यांनीही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समचार घेतला आहे. महिलांना कमी लेखू नका. चंद्रकांतदादा, महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील कळणारही नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनीही आता चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते, असे टीकास्त्र रूपाली ठोंबरे-पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर सोडले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
सुप्रिया सुळे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महिलेला आदर देण्याचा माझा स्वभाव आहे. तसा सुप्रिया ताईंबद्दलही आदरच आहे. मी त्यांच्याशी बोलत असतो, असे त्यांनी सांगितले.