राजकारण

Uddhav Thackeray-Eknath Shinde यांनी एकत्र यावे - दिपाली सय्यद

मी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील तर मी सर्वांचेच आभार मानेल. भाजप असो, शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन. मी सर्व ठिकाणी गेले. अनेक नेत्यांना, आमदारांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. दोन्ही ग्रुपमध्ये इगो हर्ट आहे. तो तुटला तर या गोष्टी पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं. अशातच आता दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी पुढाकार घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं असे यावेळी परिषदेत म्हटले आहे.

राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यांना शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.

मी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील तर मी सर्वांचेच आभार मानेल. भाजप असो, शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन. मी सर्व ठिकाणी गेले. अनेक नेत्यांना, आमदारांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. दोन्ही ग्रुपमध्ये इगो हर्ट आहे. तो तुटला तर या गोष्टी पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं.

दिगंबर नाईक हा सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या ग्रुपमध्ये होता. मला शिंदे यांनी सेनेत आणलं. त्यांच्यामुळे मी पक्षात काम करतेय. पण माझे नेते उद्धव ठाकरे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता प्रत्येक पक्ष आपआपला विचार करतोय. नैसर्गिक युती होत असेल, चांगल्यासाठी होत असेल तर झाली पाहिजे. शिंदेंची घरवापसी झाली पाहिजे. एका घराचे दोन तुकडे नको. येणाऱ्या काळात हे होईल असं मला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट