मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेचा आम्हाला कुठलाही आनंद झालेला नाही. कुठल्या तरी पक्षात जावे म्हणून ही कारवाई हे सुद्धा चुकीचे आहे. दुसरा कुठलाही पक्ष त्यांना घेणार नाही. एकटा राष्ट्रवादी (NCP) त्यांना घेऊ शकतो, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
दीपक केसरकर म्हणाले की, जर ते निर्दोष असतील, तर कोर्टासमोर पुरावे सादर करतील. व त्यांना आत जावे लागणार नाही. आम्ही त्यांच्या अटकेची कधीही मागणी केलेली नाही. संजय राऊत यांचे चुलत भावाला वर्षभरासाठी शिक्षा सुनावलेली आहे.
फक्त राजकीय व्यक्तींवर कारवाई नाही. बिल्डर व व्यवसायिकांवर कारवाई झालेली आहे. लोकांना रस्त्यावर यावे लागत असेल तर ही कारवाई योग्य आहे. अशा बिल्डरांना रोखण्याचे काम होईल. बिल्डरांना चाप बसेल. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल. केवळ राजकीय व्यक्ती नाही तर मोठे बिल्डर जेलमध्ये आहेत. कोणावरही आकसापोटी कारवाई नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री यांनीही मागणी केलेली नाही. मुख्यमंत्री यांच्या दिल्लीवारीचा या कारवाईची कुठलाही संबंध नाही. मंत्री मंडळ विस्तारावर चर्चेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेले होते. त्यांच्या अटकेचा आम्हाला कुठलाही आनंद झालेला नाही. कुठल्या तरी पक्षात जावे म्हणून ही कारवाई हे सुद्धा चुकीचे आहे. दुसरा कुठलाही पक्ष त्यांना घेणार नाही. एकटा राष्ट्रवादी त्यांना घेऊ शकतो, अशी टीका केसरकरांनी संजय राऊतांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबियांना भेटणे आनंदाची बाब आहे. यामिनी जाधव, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई झाली त्यावेळी ते दिसले नाहीत, असा निशाणाही त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.
दरम्यान, शिवसेना संपणार असे त्यांना म्हणायचे नसेल. युती राहील असे म्हणायचे असेल. ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणार नाही, अशी सारवसारव करण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांनी केला.