राजकारण

शिंदेंना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले…

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे समर्थक आमदार चांगलेच आक्रमक झालेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून काल हकालपट्टी केली होती. त्यानंतर शिंदे गट याला प्रत्युत्तर देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले ५० आमदार सध्या गोव्यामध्ये आहेत. हे आमदार उद्या मुंबईत येणार आहेत. त्याआधी या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता राज्याचे प्रमुख आहेत, याची आठवण केसरकर (Deepak Kesarkar) यांनी करुन दिली. तसंच एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढून टाकणार शिवसेनेने (Shivsena) जाहीर केलेलं पत्र हे आक्षेपार्ह आहे. त्याला आव्हान दिलं जाईल, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या विरोधात कायदेशीर पाऊल आपण उचलणार असून शिवसेनेला रितसर उत्तर पाठवणार आहोत. अशा तऱ्हेची कृत्ये लोकशाहीसाठी शोभादायक नाही.

शिवसेनेकडून कार्यकर्त्यांचं प्रतिज्ञापत्र तयार करुन घेतलं जात असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, अनेक कार्यकर्त्यांकडून अँफिडेव्हिट करण्याची मोहिम चाललीये. पण तशी पद्धत नाही, हे कोणतंही बंधन नाही, प्रेमाचं बंधन लागतं. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे. बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) निशाणी म्हणून आम्ही ते बांधलं आहे. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र तयार करणं हे दिशाभूल करण्याचं काम आहे. कार्यकर्त्यावर गैरविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे. अॅफिडेव्हिट केल्यानं बंधन येत नाही, शिवबंधन हे नातं अजूनही कायम आहे आणि ते अबाधित राहील.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड