शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा हा दावा चांगलाच व्हायरल होत आहे. मी शिर्डीत होतो म्हणून कोल्हापूरचा पूर टळला. असा दावा केसरकरांनी केला आहे. देवाकडे मी प्रार्थना करत होतो. याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा.
ज्यादिवशी पूराची परिस्थिती होती. त्यादिवशी मी योगायोगाने शिर्डीत होतो. त्यानंतर कोल्हापूरमध्ये राधानगरीचे पाणी सोडल्यानंतर 5 फुटानं लेवल वाढते. मात्र यावेळी एक फुटानेही लेवल वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. असे केसरकर म्हणाले.