राजकारण

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; रवी राणा यांची प्रतिक्रिया

Published by : Dhanshree Shintre

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान मधून धमकी आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर क्लिप पाठवून दिली धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फोन कॉल करणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (२),67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तान मधून धमकी आली. खासदार ओवीसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. ओवैसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल.लोकसभा मध्ये खासदार ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. अनेकदा ओवैसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वरून धमकी आली यात मोठं मोठ्या भाजपच्या नेत्यांची नावे घेतले. माझं रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणं झालं ATS ची चौकशी लागली. देशाला उडवून देण्याची धमकी दिली. गृह विभाग चौकशी करत. केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन