Devendra Fadnavis  Team Lokshahi
राजकारण

उध्दव ठाकरेंनी...,फक्त थापा मारल्या; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

मागच्या सरकारने अडीच वर्षात कोकणसाठी एकही काम केलं नाही.

Published by : Sagar Pradhan

आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आंगडेवाडी येथील भराडी देवी यात्रेला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्याठिकाणी भाजपकडून सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत बोलत असतानादेवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सिंधुदुर्ग येथील सभेत बोलत असताना फडणवीस म्हणाले की, नारायन राणे यांच्या पुढाकारातून चिपी विमानतळ झालं. या विमानतळासाठीचं श्रेय नारायण राणे यांना दिले पाहिजे. पण, काही लोकांनी याचं दोन वेळा उद्घाटन केलं. ज्यांनी या विमानतळाची एक वीट देखील रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात कोकणासाठी केलेली एक गोष्ट दाखवावी. त्यांनी फक्त थापा मारल्या. असा निशाणा त्यांनी यावेळी साधला.

पुढे ते म्हणाले की, चक्रीवादळातील मदतीचे पैसे देखील दिले नाहीत. हेच यांचं कोकणावरील प्रेम आहे काय? मागच्या सरकारने अडीच वर्षात कोकणसाठी एकही काम केलं नाही. कोकणात आलेल्या दोन चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचं दीडशे-दोनशे कोटीही दिले नाहीत. कोकणने त्यांना आशिर्वाद दिला, मात्र उतराई होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी कोकणकडे दुर्लक्ष केलं, असा घणाघात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

आमच्या पाच वर्षांच्या काळात आम्ही कोकणसाठी मोठा निधी दिला. परंतु, ठाकरे सरकारने कोकणसाठी एकही योजना आणली नाही. मात्र, यापुढे आमच्या सरकारचं कोकणकडे विशेष लक्ष असणार आहे. बजेट करायला घेत आहोत. तुम्हाला काय हव आहे ते मागून घ्या असं सांगत कोकणातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालणा देणार, रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचं नुकसान केलं. परंतु, भराडीदेवीनं आम्हाला कौल दिल्यामुळे आम्ही सत्तेत आलो आहोत. आता हा प्रकल्प आम्ही आणू. या प्रकल्पातून कोणतील तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल. असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी