राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर राजकीय मंडळींमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असताना त्यातच आज राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यानंतर पार पडले. दरम्यान, अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अधिवेशनात काय घडले याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले फडणवीस?
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालं. या अधिवेशनात भरपूर कामकाज झाले. विरोधीपक्षाकडून भहिष्कार झाला. कामकाज बंद करण्यात आली. नंतरच्या वेळेत भरपाई करत प्रचंड कामकाज केले. विरोधीपक्षाचे आभार, सुरवातीला बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र, पुढे सहभाग नोंदवला.
पुढे म्हणाले की, शेवटी नागपूरला अधिवेशन असे घ्या का म्हणतो. कारण नागपूरला अधिवेशन घेतले तर विदर्भ केंद्रस्थानी असतो. परंतु, अतिशय यशस्वी अधिवेशन झाले आहे. विरोधीपक्षांनी मांडलेल्या प्रस्तावांना अतिशय प्रभावी उत्तर देऊन मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला उघड पडलं.
महापुरुषांचा विषय असो, राजकीय कारवायांचा विषय असो. याबाबत योग्य ती आकडेवारी मांडून हे सरकार कसे प्रभावी काम करत हे विरोधकांना आणि महाराष्ट्राला दाखवून देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी याद्वारे केले आहे. रोज जे लोक लोकशाहीची दुवाही देत होते. ते लोक या अधिवेशनात फक्त ४६ मिनिट होते. त्यामुळे लोकशाहीवर त्यांचे किती प्रेम आहे यावरून लक्षात येते. त्यामुळे आम्ही लोकशाही मानणारे आहोत. या अधिवेशनातं आम्ही सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.