मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आजही राऊतांना न्यायालयाचा दिलासा मिळालेला नसून कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांचा 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगाच मुक्काम असणार आहे.
मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना तीन वेळा कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, संजय राऊत यांना कोर्टाने आजही तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा 19 सप्टेंबर पर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.