मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. अशातच सदाभाऊ खोत यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात, असे खोत यांनी म्हंटले होते. यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला असून खोत यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहे. यावर आज सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. मी केलेलं विधान फार मोठा नाही, असे त्यांनी म्हणाले आहेत.
सदाभाऊ खोत म्हणाले की, मी केलेलं विधान फार मोठा नाही. मी राजकारणी आहे. ते बोलताना मला काही शंका आली नाही. ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांच्या मनाला हा शब्द लागू शकतो. तुम्ही तुमचे प्रश्न राजकारण्यांच्या समोर बोललं पाहिजे असा माझा हेतू होता. राज्यात, देशात शेतकरी, बेरोजगार लोक आत्महत्या कोणामुळे करत आहेत याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे
तर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील आणि राज्यातील महापुरुष ही आमची दैवत आहेत ते आमचे आदर्श आहेत. त्यांचा अवमान होत असेल तर मला नाही वाटत की कोणी बोलत असेल. आजकाल अस झालं आहे की एखाद्या शब्दाचा किस पडायचा आणि तो आपल्या सोयीनुसार अर्थ काढायचा. ज्या कोणाला वाईट वाटत असेल की त्याच्याबद्दल हे बोलले त्याच्याबद्दल ते बोलले.
तर पहिल्यांदा त्यांनी तुम्ही तसं वागल आहे का हे बघायला पाहिजे. राज्यपाल हे हिंदीमध्ये बोलले. त्यांच्या बोलण्याचे टोनिंग, त्यांची मानसिकता हे तपासायला हवं. थोर व्यक्तीचा अपमान व्हावा हे कुठल्याच शहाण्या व्यक्तीला वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, राज्यपाल यांच्यावर कारवाई व्हावी या प्रश्नावर सदाभाऊ यांनी उत्तर देणे टाळले.
उसाच्या एफआरपी बाबत या सरकारने निर्णय घेतला. आधीच्या सरकारने तर आम्हाला भेटायलाही बोलावलं नव्हतं. आधी आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता किमान आम्हाला चर्चेसाठी बोलावलं जातं.
या सरकारने जरी आमचे ऐकले नाही तर आम्ही शेतकरी आणि बेरोजगार तरुण यांच्या बरोबर आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.