उदय चक्रधर | गोंदिया : शिवशक्ती आणि भीमशक्तीची युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर अनेकदा कॉंग्रेसवर टीका करताना दिसतात. आंबेडकरांना आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर नेहमीच कॉंग्रेसला ब्लॅकमेल करतात, असा गंभीर आरोप पटोलेंनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त नाना पटोले गोंदियात आले होते. यावेळी ते बोलत होते.
नाना पाटोले म्हणाले की, प्रकाश आंबडेकर नेहमीच कॉंग्रेसला ब्लॅकमेल करतात. आमच्याशी कधीही समोर येऊन बोलत नाही, मागे बोलतात. त्यामुळे त्यांनी आमच्या कॉंग्रेस पक्षाबद्दल बोलू नये. आपल्या पक्षाचे काम त्यांनी करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मुंबईत येथे विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. यावर नाना पटोले म्हणाले की, भाजप विरोधी पक्षात असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करत होते. मात्र, केंद्रात आणि राज्यात सरकार असताना सुध्दा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भाजप का देत नाही, असा पटोलेंनी विचारला आहे.
दरम्यान, संयज राऊतांनी जास्त बडबड करु नये. त्यांना जेल मध्ये टाकू, असे विधान मंत्री दिपक केसरकर यांनी केले होते. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू अशाबाबतीत वेळ न घालवता जनतेचे प्रश्न सरकारने सोडविले पाहिजे. राज्यात बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्याकडे आधी लक्ष द्या. भाजप सरकारला सतेची मस्ती आली आहे. त्यामुळे असे विधान सत्तेत असलेले मंत्री आणि नेते करतात हे बरोबर नाही, अशी टीका पटोलेंनी केली आहे.