लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा करत निवडून लढवली होती. पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक भाषणात 'काँग्रेसमुक्त भारत' असेच घोषवाक्य ऐकायला मिळायच. परंतु आता भाजपचे अधिकारी काँग्रेस विषयी चांगले बोलताना दिसत आहे. असच चंद्रकांत पाटील काँग्रेस विषयी चांगल वक्तव्य केल आहे.
सोलापुरमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणजे 'काँग्रेसचे नेते वेल कल्चरड आहेत. ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीवर काही भरवसा नाही', अस वक्तव्य चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते सुसंस्कृत आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भुलणार नाही. अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.