राजकारण

पुण्यात तक्रारीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्यापासून कुणाला धोका‌ नाही, राजकीय धोका...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. भाजपाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्यापासून कुणाला धोका‌ नाही. राजकीय धोका मात्र होऊ शकतो, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मी छोटा कार्यकर्ता आहे. माझ्यापासून कुणाला धोका‌ नाही. राजकीय धोका मात्र होऊ शकतो. मी कुणाला धमकी देत नाही. ज्याने तक्रार दिलीय त्याला स्टेन गन घेऊन संरक्षण द्यावे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

तर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नावच नसल्याने त्यांनी दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, ईडीबाबत बातम्या आल्यात त्या चुकीच्या आहेत. चौकशी अजूनही सुरु आहे. त्यात काही दिलासा दिलाय असं म्हणायचं कारण नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

शरद पवार आणि उध्दव ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी एकसंध आहे. कुठलाही वाद नाही. काही वक्तव्यावरुन मतमतांतरे निर्माण झाली होती. त्यावरुन आघाडीत वाद आहे असं‌ वाटत होतं. पण तसं काही नाही. नागपुरच्या सभेला मी जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले का असं माध्यमांमध्ये जातात हे मला कळत नाही. आमची बैठक होईल तेव्हा आम्ही चर्चा करु, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अवकाळी पावसासंदर्भात चर्चा करु. शेतकऱ्यांना मदतीची गरज‌ आहे. राजकीय चर्चा काही नाही, अशीही माहिती अजित पवारांनी दिली आहे. अवकाळी नुकसानीसंदर्भात अजित पवारांनी मंगळवारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले होते.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result