चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर 4 राज्यांमध्ये निकालानंतर सरकार बनवण्यासाठी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. चारही राज्यात विधानसभा निकालानंतर निरीक्षकांची समिती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातले मुकुल वासनिक राजस्थानमध्ये निरीक्षक तर पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे मध्य प्रदेश मध्ये निरीक्षक असणार आहेत. आमदार सांभाळणे आणि नंतर नेता निवडीची प्रक्रिया यामध्ये निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.