राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन घडामोडींना वेग आलेला असताना. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडीकडून आज तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. याच चौकशीनंतर ईडी चौकशीनंतर चहल यांनी माध्यमांशी संवाद आहे.
काय म्हणाले आयुक्त चहल?
चौकशीनंतर चहल म्हणाले की, जून 2020 मध्ये राज्य शासनाने जम्बो कोव्हिड सेंटरचा निर्णय घेतला होता. कारण मुंबईत कोरोना संकट आलं तेव्हा मुंबईत महापालिकाकडे चार हजारही बेड्स नव्हते. तेव्हा आपल्याकडे 3750 बेड्स होते. मुंबईची लोकसंख्या जवळपास 1 कोटी 40 लाख असताना बेड्सची ही संख्या फार कमी होती. त्यावेळी रिपोर्ट मिळत होता की, लाखो जणांना कोरोनाची लागण होईल. तो अंदाज खरा ठरला. असे ते म्हणाले.
मुंबईत तबब्ल 11 लाख जणांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा राज्य सरकारने मैदानांमध्ये कोव्हिड हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला. दहीसर, मुलूंड, बीकेसी, सायन, मालाड, कांजूरमार्ग या ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल बांधण्यात आले. पण इथे मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने सगळे हॉस्पिटल बांधले नाहीत. या बांधकामात मुंबई महापालिकेचं योगदान शुन्य होतं. असे देखील माहिती दिली.