शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सभा पार पडली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला 8 जून रोजी 37 वर्षे पूर्ण होत आहे. (cm uddhav thackeray speech aurangabad today shiv sena rally sanjay raut renaming sambhaji nagar water issue)
या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जनसागर लोटल्याचे पहायला मिळत आहे. औरंगाबादेत शिवसैनिकांची तुफान गर्दी सभेवेळी पहायला मिळाली. यावेळी शिवसेना नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरचा पाणीप्रश्न बिकट होता. संभाजीनगरमध्ये 1972 सालची पाण्याची जुनी योजना सुरू करणार आहे. पाणी योजनेसाठी निधी पुरवणार आहे. तसेच कंत्राटदाराने हयगय केली तर दया, माया दाखवणार नाही. यासाठी एकही रूपया कमी पडू देणार नाही, तसेच पाणी प्रश्न असताना मी पाठ फिरवणार नाही. आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हता सत्ता गेली म्हणून त्यांचा हा क्रोश होता. अशा शब्दांत यावेळी विरोधकांचा समाचार घेतला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सुरूवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव केंद्राकडे पाठवला आहे. का होत नाहीये. तुमच्याकडे काही दिलं तर झाकायचं आणि आमचं बोंबलत सुटायचं. जेव्हा मी नामांतर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल अभिमान वाटेल असं करेन