राजकारण

बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केलेल्यांनी...; शिंदेंचा उध्दव ठाकरेंना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केलेल्यांनी आम्हाला सांगू नये, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

महाराष्ट्रात खोके सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत कि नाही माहित नाही. मुख्यमंत्री कधी बोलतच नाही त्यांना विचारले तर काळजी करु नका पंतप्रधानांना सांगितलेले आहे. मुख्यमंत्री हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकत का, अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे या राज्यात त्यांचा अवमान कोणीही सहन करणार नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून जे सुरू आहे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

आम्ही जे दिवसरात्र काम करीत आहोत. ते पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळेच असे प्रकार सुरू आहेत. ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा निशाणा त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर अचानक त्यांनी नाशिक शहरातील एक बड्या सुप्रसिद्ध राजकीय ज्योतिषी बाबाचे हे मंदिर आहे. त्याच्याकडून यापूर्वीच भविष्य जाणून घेतल्याची चर्चा असून त्याविषयी तोडगा काढण्यासाठी पूजा केल्याची चर्चा आहे. यावरुन विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मी शिर्डीला गेलो. तेव्हा दोन मंत्री, अधिकारी आणि मीडिया सोबत होती. आम्ही सगळे काही उघडपणे करतो. यांच्यासारखे लपून काही करीत नाही. हात दाखवायचे म्हणाल, तर आम्ही ३० जूनला ज्यांना दाखवायचा त्यांना दाखवला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने