राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर राजकीय मंडळींमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच आता राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडत आहे. दरम्यान, या अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधकांची चांगलीच जुंपलेली दिसून आली. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. परंतु, या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर चांगलेच बरसले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
अडीच वर्षांत एका प्रकल्पाला मान्यता दिली आम्ही 18 प्रकल्पांना मान्यता दिली. चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर नंतर गेलो तर तिकडे 'वर्षा'वर पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे काम करायचे म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, अस ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, अजित दादांकडून कालचे निर्णय झाले त्याचे स्वागत होईल असे वाटलं होते. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटलं नव्हतं की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ, आमच्या सरकारच्या कामाचा हा वेग त्यांनी पाहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.