मुंबई : एक शस्रक्रिया आम्ही 30 जूनला केली. ती शस्रक्रिया यशस्वी झाली. बरेच लोक तडातड फिट झाले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आज ५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पाच वर्ष कशी गेली ती कळलीच नाही. शिवसेना मदत कक्षाचे काम गावगाव पोहचले आहे. कोव्हिड काळात रेकॉर्ड ब्रेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत 3 लाख रुपयांपर्यंत वाढविली. आजही मी आपल्यातला आहे. एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझे पाय जमिनीवर आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
एक शस्रक्रिया आम्ही 30 जूनला केली. ती शस्रक्रिया यशस्वी झाली. बरेच लोक तडातड फिट झाले. काही लोकांचे मास्क गेले. सोशल डिस्टन्सिंग गेले. मला लोक डॉक्टर म्हणू लागले. खोके म्हणाऱ्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. मानसिक उपचार आमच्या ठाण्यात होतात, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.