राजकारण

चिंचवड पोटनिवडणुकीत राडा; अपक्ष उमेदवार समर्थक-भाजप माजी नगरसेवकात हाणामारी

महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठीत बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठीत बनलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून मतदानाला गालबोट लागले आहे. पिंपळे-गुरव मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला. अपक्ष उमेदवार समर्थक-भाजप माजी नगरसेवकात हाणामारी झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मतदान सुरु झाल्यानंतर 100 मीटरच्या आवारात कोणीही थांबू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक मतदान केंद्रावरती थांबले होते. यावरुन भाजपचे माजी नगरसेवक आणि कलाटे समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला. व याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे. हा संपूर्ण प्रकार पिंपळे गुरवचे मतदान केंद्र 353 आणि 354 घडला आहे. याठिकाणी पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तरीही परिसरात वातावरण अद्याप तणावपूर्ण आहे.

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप तर, महाविकास आघाडीकडून नाना काटे मैदानात आहेत. तर, राहुल कलाटे अपक्ष लढत आहेत. तर, तिन्हीही उमेदवारांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे चिंचवडकर कोणाला आपला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Lokshahi Marathi Live Update :

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड