राजकारण

Chitra Wagh: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून मी दिल्लीत जाईन. दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन, प्रधानमंत्री होईन त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्की त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शाहांना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री केलं असं मला एकांदरीत जे काय राजकारण मला कळतंय त्यानुसार दिसतंय अशी टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केली आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, तुम्ही आणि तुमचे वाचाळ चेले सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडून देवेंद्रजींवर पातळीहीन टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राचा महानालायक’ हा किताब तुम्हाला संयुक्तपणे विभागून द्यायला हवा. तुमच्या स्वत:च्या लायकीचा फुगा महाराष्ट्राच्या जनतेने कधीचाच फोडलाय. त्यामुळे परत एकदा लायक कोण आणि नालायक कोण, याची आठवण तुम्हाला करून देते.

ज्याच्यामुळे राज साहेबांनी पक्ष सोडला तो कटकारस्थान करणारा नालायक भाऊ कोण? ज्यामुळे वैतागून नारायण राणे साहेब पक्षातून बाहेर पडले ते स्वर्गीय बाळासाहेब आणि नारायण राणे साहेब यांच्यामध्ये दरी निर्माण करणारा तो नालायक कोण? वडिलांच्या ज्वलंत विचारधारणाला तिलांजली देणारा तो नालायक मुलगा कोण? सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याच मित्र पक्षाला धोका देणारा, शत्रूशी हाथ मिळवणी करणारा तो नालायक मित्र कोण? काँग्रेसला आयुष्यभर शिव्या दिल्यानंतर आता काँग्रेसच्या दरबारी दिल्लीला सोनिया दरबारामध्ये पायावरती लोळण घेणारा तो नालायक कोण? अडीच वर्ष ज्याने तिच्या दारात आणि शेतकऱ्याच्या बांधावर न जाणारा तो नालायक मुख्यमंत्री कोण? कोविडमध्ये माणसं मरत असताना त्यांच्या टाळूवरचा लोणी खाणाका तो नालायक मुख्यमंत्री कोण? ओवेसी आपल्या मातीमध्ये येतो औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो त्यावेळेला शेरूट पाठीला लावून पळणारा तो पळकुटा नालायक कोण? चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले, सोळा खासदार तुम्हाला सोडून गेले असा नेतृत्वहीन नालायक कोण? आणि उद्धवजी आमच्या देवेंद्रजींना अटक करण्याचं कटकारस्थान करणारा तयारी करणारा तो खलनायक नालायक कोण? आणि म्हणून उद्धवजी, तुमच्या नालायकपणाच्या, निर्लज्जपणाच्या आणि कोडग्या वागणुकीची यादी संपणारी नाही…यापुढे आमच्या देवेंद्रजींवर बोलतांना सांभाळून बोला

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...