राजकारण

Chitra Wagh : या काँग्रेसच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या डोळ्यात फक्त खुर्चीसाठी असुरी भूक

चित्रा वाघ यांनी ट्विट करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चित्रा वाघ यांनी ट्विट करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, तुष्टीकरण आणि वोट बँकेचे राजकारण करताना काँग्रेसने नीच पणाची पातळी गाठली आहे. चांदिवलीतील काँग्रेस उमेदवार नसीम खानचा प्रचार करताना त्याच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाच्या फोटोवर नसीम खानचा फोटो चिकटवला. या घृणास्पद कृत्यातून काँगेसची मानसिकता दिसून येते.

हे नेते स्वतः आपल्या हिंदू दैवतांचा अपमान करू शकतात. हिंदू दैवतांवर काहीही बोलतात. एकंदरीतच काँग्रेसी मेंदू तुष्टीकरणाच्या घाणेरड्या विचारांनी बरबटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनते माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे. तुम्हा सगळ्यांना जिजाऊ आणि झाशीच्या राणीची भूमिका निभावयाची आहे गं. आपल्या राजाचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, आज ते गणपतीच्या फोटोवर स्वतः चा फोटो चिकटवत आहे उद्या आपल्या मंदिरांमधल्या मूर्तीं मंदिराबाहेर काढतील. कर्नाटक आठवा यांनी आपल्या बाप्पाला जेरबंद केलं होत. या काँग्रेसच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या डोळ्यात फक्त खुर्चीसाठी असुरी भूक दिसते आहे. पण माझ्या हिंदू बांधवांनो आणि लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा ते जर वोट जिहाद करत असतील तर आपण मतांचं धर्मयुद्ध करूया. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?

'शरद पवार हे तालुक्याचे नेते', राज ठाकरेंचे खडकवासल्यात मोठे विधान

Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'