कल्पना नळसकर| नागपूर: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद देखील अधिकच तीव्र झाला आहे. या वादादरम्यान आता उद्यापासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच अधिवेशाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काही विषयांवर भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
नागपूरमध्ये एक कार्यकर्ता म्हणून यायचो. नंतर मंत्री म्हणून आलो. आता मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी मिळाली. विदर्भ, नागपूर या भागाशी जिव्हाळ्याशी संबंध आला. हे अधिवेशन फार महत्तवाचं आहे. किती चालवावं यासाठी विरोधी पक्षानं काही आग्रह केला. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. विरोधी पक्षाच्या इच्छेप्रमाणे सर्व होईल. 2019 ला आम्हाला जे घटना पाहिजे म्हणताय 2019 ला जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली संसार दुसऱ्याशी थाटला हे सर्व जनतेला माहित आहे. ज्या मतदारांच्या भावना मी त्याच्या नंतर अधिवेशन आपल्याला बाकीचे मुद्दे ठेवायचे आहेत. त्यामुळे कोणी कुणाशी काय केलं हे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे समजते आणि त्याचबरोबर त्यांनी खोके सरकार आहे मी त्यावर यापूर्वी जास्त काय बोललो नाही पण अजितदादांच्या तोंडून ही भाषा त्यांची मला वाटतं शोभणारी नाही.
पुढे ते म्हणाले की, कारण खोक्यांच्या जर एकावर एक ढिगे लावला एवढे शिकार उंच होईल. ते ती बघता बघता नजर पोहोचणार नाही पोचली तर तिथून कडेलोट होईल. त्यामुळे त्याच्यावर मी नंतर सभेत बोलेन आणि सगळी तिच्या बाबतीत म्हणाल तर अनेक विभागांमध्ये तरतूद होती दोन हजार कोटीची मान्य प्रशासकीय मान्यता 6000 कोटी 7000 कोटी म्हणजे हे काय चाललं होतं आणि खरं म्हणजे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया आम्हाला या राज्याचा काय लवासा करायचा नाहीये. जे आपली जी तरतूद प्रमाणे वागले पाहिजे आपण आणि त्याच्यावर मी आता एवढेच बोलू इच्छितो. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.