छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आणि म्हणाले की, हे बघा झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. नौदल सेनाने तो पुतळा उभारला चांगल्या मनाने परंतू दुःख देणारी घटना आता झालेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की झालेली घटना दुर्देवी आहे पण त्याचं राजकारण करणं हे त्याच्यापेक्षा दुर्देवी आहे. म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, दैवत आहे यावर राजकारण करु नये.
माफीची मागणी ते करतायेत तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायांवर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच आणि त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील खूप बुद्धी द्यावी आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहिल यासाठी विधायक काय आहे ते तुम्ही याठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कालच्या बैठकीमध्ये नौदल सेनाच्या अधिकाऱ्याने विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा. कारण त्यांना तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी अशा प्रकरची मागणी केली आहे.