मुंबई : गेल्या काही महिन्यात राज्या आणि देशात गुवाहाटी हे शहर अत्यंत चर्चेत आलं कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर त्यांनी सुरत आणि नंतर गुवाहाटी हे शहर गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडलेले 40 आमदारही होते. यावेळी त्यांनी आसाममधील कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. त्यानंतर आता भाजपसोबत सरकार स्थापन केलेले शिंदे थेट मुख्यमंत्री झाल्याने ते आता पुन्हा आपल्या समर्थनातील 40 आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनसाठी गुवाहाटीला जाणार आहेत.
आज सकाळी साडे नऊ वाजता आमदार आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटी जायला निघतील. तर गुवाहाटीला आसाम चे मुख्यमंत्री यांच्याकडून स्वागत करण्यात येणार आहे. तर ते याठिकाणी कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
मुख्यमंत्री शिंदें गुवाहाटी दौऱ्यावर जाण्याअगोदर मुंबईमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यातील शहीदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रद्धांजली देणार आहेत.