राजकारण

'कसं काय पाटील बरं आहे का, काल दिल्लीत झालं ते खरं आहे का?'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयंत पाटील यांना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अजित पवार व्यासपीठावरुन निघून गेले. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः ब्रेक लावला आहे. परंतु, यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची फिरकी घेतली आहे.

सरन्यायधीशांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्याने जयंत पाटलांनी टीका केली होती. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, सरन्यायधीशांचा सन्मानाचा कार्यक्रम हायकोर्टाचा होता. त्यात मला, उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही निमंत्रण दिले होते. परंतु, त्यांच्यावरही टीका करण्यात आली. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले म्हणून गेलो होतो. महाराष्ट्राचा सुपुत्र सरन्याधीश होतो ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी म्हंटले. तसेच, मराठीत एक गाणं फेमस आहे. कसं काय पाटील बरं आहे का काल दिल्लीत झालं ते खरं आहे का, असा टोलाही जयंत पाटलांनी शिंदेंनी लगावला आहे.

दिल्लीमध्ये जयंत पाटील यांनी अजित पवारांना बोलू दिल नाही. अजित पवार रागाने निघून गेले. कारण जयंत पाटलांना विरोध पक्षनेते व्हायचे होते. परंतु, ते होता आले नाही. परंतु, अजित दादांची दादागिरीने तिकडे काम केले. याचे शल्य जयंत पाटलांच्या मनामध्ये होते. म्हणून महाराष्ट्रात अजित पवारांना थांबवता येत नाही म्हणून दिल्लीमध्ये त्यांना थांबवले. हा त्यांचा अंतर्गत प्रकरण आहे, असेदेखील शिंदे यांनी म्हंटले आहे.

काय झाले होते नेमके दिल्लीत?

शरद पवार बोलण्याला उभे राहण्यापुर्वी अमोल कोल्हे भाषण करतील, अशी घोषणा करण्यात आली. अमोल कोल्हेंनंतर जयंत पाटील भाषण यांच्या नावाची घो।णा करण्यात आली. याचवेळी कार्यकर्ते अजित दादांनी भाषण करावे, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होणार असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मात्र, अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ते स्वतः उठून पाठीमागे गेले. आणि त्यानंतर शरद पवार बोलतील, असे त्यांना वाटले होते. परंतु, पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणाची घोषणा करण्यात आली. सुप्रिया सुळे स्वताः गेटच्या पाठिमागे गेल्या आणि अजित पवार यांना भाषणास येण्याची विनंती केली. त्यांना बोलविण्याचे प्रयत्न केले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे हिंदीमधून गाणे लॉन्च करण्यात आले. युथ कॉंग्रेसचा झेंडा लॉन्च करण्यात आला. तरीही ते बोलले नाही.

यावर आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन नाही तर वॉशरूमसाठी गेलो होतो. वॉशरूमसाठी गेलो तरी मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात, असे त्यांनी सांगितले.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु