राजकारण

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण

राज्यात सत्तांतरानंतर भाजप-शिंदे गटाची मनसेशी जवळीक वाढली आहे. राज्यात नवी महायुती दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर भाजप-शिंदे गटाची मनसेशी जवळीक वाढली आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी महायुती दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावर पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेंसह त्यांच्या पत्नीही उपस्थित आहेत. यामुळे पुन्हा एकदा मनसे व भाजप-शिंदे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. राज ठाकरेंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी म्हंटले आहे. तत्पुर्वी, कालच श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील फडके रोड येथील जवळच असलेल्या मनसे कार्यालयाला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठे वक्तव्य केले होते.

राजू पाटील म्हणाले की, वैयक्तिक असे काही नसते, एकमेकांना शुभेच्छा आम्ही नेहमीच देत असतो. युती करायची की नाही करायची तो सर्वस्वी निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आहे. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्याला युती सोबत जायचंय, तर आम्ही त्यालाही तयार आहोत. मात्र एक निश्चित, इथे आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल, असे सूचक विधान त्यांनी केले होते. राजू पाटील यांच्या या वक्तव्यावरुन राजकारणात शिंदे गट,भाजप आणि मनसेत युती होणार अशी एकच चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील व आशिष शेलार यांनी मनसेसोबत युतीच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे व फडणवीस सरकार एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. कार्यकर्त्यांची मने जुळलेलीच आहेत. पण, निर्णय कार्यकर्ते नव्हे तर नेते घेतात, असे त्यांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी