बदलापूरच्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात ग्वाही दिलेली आहे. किंबहूना बदलापूरच्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची आपण मागणी करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री म्हणातायेत.
जो माझ्या बहिणेला हात लावेल त्याला सोडणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली आहे. आरोपी अक्षय शिंदेली फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असं मुख्यमंत्र्यांचं विधान आहे. बदलापूरच्या आंदोलनात डिजीटल बोर्ड कुठून आले हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
बदलापूरमध्ये झालेली जी घटना आहे ती दुर्देवी आहे, अतिशय दुःखद आहे, वेदना देणारी आहे आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून त्याठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली, फास्ट्रेकवर केस चालू झाली. ते जेव्हा चालू होईल सरकारी विशेष वकिल नेमला जाईल. SIT स्थापन केली आहे, त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केली त्यांना ससपेन्ड केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो आहे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार. विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करु लागले. त्याचं राजकारण करुन आंदोलन पेटवू लागले. रास्तारोको, रेल्वेरोको केलं सात-आठ तास रेल्वे रोखली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.