थोडक्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार-सूत्र
राज्यपालांकडे CMपदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता
शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे राहणार काळजीवाहू मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
14 व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असून पुन्हा एकदा नव्याने महायुतीचे सरकार येणार आहे. लवकरच महायुती सरकार स्थापन करणार असून मुख्यमंत्री कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? सत्ता स्थापन कधी होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपालांकडे सीएमपदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.
शपथविधी पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.