Chhattisgarh Election Results : छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. एकूण 90 जागांसाठी येथं काँग्रेस आणि भाजप या दोन मातब्बर पक्षांमध्ये लढत आहे. स्थानिक शेतकरी बघेल यांच्यावर खूश असल्याचं माय एक्सिस पोलच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. एकूण 90 जागांसाठी इथं काँग्रेस आणि भाजप या दोन मातब्बर पक्षांमध्ये लढत आहे. छत्तीसगडची 70 टक्के जनता ही शेती करते. स्थानिक शेतकरी बघेल यांच्यावर खूश असल्याचं माय एक्सिस पोलच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यांनी वर्षातून 4 वेळा शेतकऱ्यांना बोनस दिला असल्याने शेतकरी काँग्रेसच्या बाजूने कल देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे
मात्र, महादेव अॅप आणि सीबीएससी भरती घोटाळ्यामुळे शहरी भागात काँग्रेस आणि बघेल यांच्यावर नाराजी आहे.. या प्रकरणाचं खापर काँग्रेस इडी आणि भाजपवर फोडतं आहे. तर शहरी भागात 19 जागा असल्याने इतर भागांत काँग्रेसचं पारडं जड होऊ शकतं असंही एक्सिस पोलच्या सर्व्हे मधून दिसतं आहे.
तसंच, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे छत्तीसगढमध्ये प्रचारासाठी गेले होते..फेज वन मध्ये बस्तर आणि राजनाथ या आदिवासी बहुल गावांत माय एक्सिस पोलनुसार काँग्रेस 9 आणि भाजप 10 जागांवर येण्याचा कल दिसून आला आहे. सरभुजा इथं मागे 14 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीने हे अंतर कमी केलं.
काँग्रेस उमेदवार भूपेश बघेल , भाजप उमेदवार विजय बघेल यांच्यात पाटण मतदार संघातून लढत आहे.. भाजप उमेदवार रमण सिंह विरुद्ध काँग्रेस उमेदवार गिरीश देवांगण यांच्यात राजनांदगाव इथं लढत आहे. काँग्रेसच्या टी.एस. सिंगदेव आणि भाजपचे राजेश अग्रवाल यांच्यात अंबिकापूर मतदार संघातून लढत आहे. या लढतीचा उद्या काय निकाल लागतो याकडे देशभरातल्या जनतेचं लक्षं आहे. तसंच स्थानिक नेते आणि मतदारांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.