जालना : करवीर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज मनोज जरांगे-पाटलांची भेट घेतली आहे. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत जरांगेंनी पाणी प्यायले आहे.
सगळे जरांगे यांच्यासोबत आहेत. आंदोलन टिकले पाहिजे, शासनाकडून आरक्षण मिळायला हवे म्हणून सर्व संघटना जरांगे यांच्या पाठीशी उभा रहा. सर्वांनी एकंमेकाना आणि पाटील साहेबांना सहकार्य करायला हवं. जाळपोळ कोण करत माहित नाही, मात्र अन्याय आणि ठपका दोन्ही करू नये, आत्महत्या करू नका त्याने काही होणार नाही, उलट सोबत रहा. आत्महत्या करू नका. शांततेने आंदोलन करा, आपल ध्येय ठेवून आंदोलन करू, असे आवाहन छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीमंत शाहू महाराजांच्या डोक्यावर हात फिरवल्याने हत्तीचे बळ आले. आता आम्ही किती ही लढू शकतो. पाठीवर हात फिरवाया राजे आले, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, राजे जनतेवरील अन्याय बंद व्हावे म्हणून बाहेर आले, आता सरकारनं आरक्षण द्यावं, असे त्यांनी म्हंटले आहे.