राजकारण

नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांची बाजी; अजित पवार गटाचे 11 सरपंच विजयी

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील 48 जागांचे निकाल जाहिर झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील 48 जागांचे निकाल जाहिर झाले आहेत. यात छगन भुजबळांनी गड राखण्यात यश मिळवले आहे. अजित पवार गटाला 11 जागांवर विजय मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे 11 सरपंच विजयी झाले आहेत. तर, शिंदे गटाचे 6 सरपंच विजयी झाले आहेत. ठाकरे गट, कॉंग्रेस, शरद पवार गट, भाजपचे प्रत्येकी 5 सरपंच निवडून आले आहेत. तसेच, मनसेचे 3 सरपंच आणि 8 ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे या गावात सरपंच पदासाठी एकही अर्ज न दाखल झाल्याने केवळ सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका