नाशिक : ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला लगावला होता. यावर आज छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कुणीही माणुसकी विसरलो नाही. म्हणून दर्शनाला गेलो आणि आशीर्वाद मागितले, असे भुजबळांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले फोटो लावल्यास मी कोर्टात जाणार. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, ते सुरुवातीला म्हणाले की, कोर्टबाजी करणार नाही. फोटोची विटंबना झाली, म्हणून कोर्टात गेले, अशी उदाहरणं आहे. मात्र आदराने कोणी फोटो लावत असेल आणि कोर्टात जाणे असं मी पाहिलं नाही.
तसेच, निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर भुजबळ म्हणाले, दोन्ही गट आपापले म्हणणं सादर करतील. कुणाची किती स्ट्रेंथ, ते सादर करतील. आणि कायद्याने जो काही निकाल आहे, तो होईल.
काय म्हणाले होते शरद पवार?
धनंजय मुंडेंच्या होमपीचवर शरद पवारांची तोफ धडाडली होती. ते म्हणाले की, आता एवढेच सांगतो तुम्ही माझं वय झालंय म्हणताय तुम्ही माझं काय बघितलं त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यानंतर काय होते एकदा या जिल्ह्याच्या मातृभूमीत येऊन आम्ही केले होते इथल्या तरुण पिढीच्या मदतीने एकेकाळी केले होते आता ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे तर जा पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा, अशी जोरदार टीका शरद पवारांनी अजित पवार गटावर केली होती.