राजकारण

शरद पवारांनी मला भेटायला बोलवलं तर...; छगन भुजबळांचं मोठे विधान

आमदारांवरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशातच, छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. आमदारांवरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील दोन आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अशातच, छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत, असा दावा भुजबळांनी केला आहे.

सिल्वर ओकवर काही आमदार जात आहेत, याबाबत छगन भुजवळ यांनी त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन, असे म्हंटले आहे. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत. दोन-चार वगळले तर सर्व आमदार आमच्या बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता, असेंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाने दावा केला आहे. तर, शरद पवारांनी सर्व आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर अशोक लहामटे आणि अशोक पवार दोन आमदार आज शरद पवार यांच्या मेळाव्यासाठी वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळी आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे.

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम

मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी