राजकारण

कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले; भुजबळांचा गंभीर आरोप, वेळीच आवरलं असतं तर...

बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरुन छगन भुजबळ यांनी घणाघात केला असून गंभीर आरोप केले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरुन छगन भुजबळ यांनी घणाघात केला आहे. कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले, असा थेट आरोप भुजबळांनी केला आहे. जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली आहे. या सभेत ते बोलत होते.

प्रकाश सोळंकेंवर हल्ला करण्यासाठी पेट्रोल बॉम्ब होते. कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले, असा आरोप भुजबळांनी केले आहेत. सरकारच्या लांगुलचालनामुळे आंदोलकांची हिंमत वाढली. वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी सरकारलाही घरचा आहेर दिला आहे. स्वकीयांची घरं जाळायला तुम्हाला सांगितलं? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या सभेतू विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर ठरवायचं असेल तर आपण सर्व मिळून या देशाच्या पंतप्रधानांना विनंती करायला जाऊ आणि सांगू एकदा जातनिहाय जनगणना करून टाका, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी