मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडत आहे. या सभेतून ते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत असतात.
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांची मुलाखत झाली.
या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे बोलतात ते अगदी बरोबर आहे. मी माळी आहे, माझी लायकी नाही. दलित समाजाच्या हाताखाली मराठ्यांनी काम करणे बरोबर नाही. राज्यात नवीन चातुर्वर्ण्य तयार झालंय. दलितांची लायकी नाही. ओबीसींची लायकी नाही. बरोबर आहे त्यांचे म्हणणे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.