राजकारण

Chhagan Bhujbal : ...म्हणून विश्वनाथन आनंदही शहांसोबत खेळण्यास नकार देतात

छगन भुजबळ यांचा मेसेजवरुन गृहमंत्री अमित शहा यांना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून सर्वपक्षीयांकडून भूमिका मांडण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका व्हायरल मेसेजवरुन गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगवला आहे.

छगन भुजबळ यांनी सभागृहात एक मेसेज वाचून दाखवला. जगजेते विश्वनाथन आनंद यांनी आजपर्यंत जगातील सर्व खेळाडूंचा पराभव केला आहे. परंतु, विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला. कारण ते म्हणाले, अमित शहा एकच डाव टाकतात की सोंगट्या कुठे जातात ते कळतच नाही. यामुळे मी खेळू शकत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडळी केल्यानंतर आमच्या मागे मोठी शक्ती असल्याचे म्हंटले होते. यावरुन आता शिंदे-फडणवीस सत्ता स्थापन झाल्यानंतर भुजबळांनी अमित शहांवर टीका केली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत झाली. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी उमेदवार होते. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केले आहे. परंतु शिंदे गटाने शिवसेनाचा व्हिप झुगारला. यामुळे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांना राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय