राजकारण

"Chandu Master यांना शिवसेनेपासून तोडण्यात आलं"

Published by : Shweta Chavan-Zagade

चेतन ननावरे | मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बंडखोर आमदारांकडून शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांना टार्गेट केले जात आहे. विशेष म्हणजे मातोश्री वर पोहचण्यासाठी मध्यस्थांकडून अडचणी येत असल्याचा आरोपही बंडखोरांनी केला आहे. मात्र हा आरोप नवा नसून शिवसेना उभारण्यासाठी रस्त्यावर रक्त सांडलेल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबियांचीही हीच तक्रार आहे. संजय राऊत साधे पत्रकार असताना त्यांनी कट्टर शिवसैनिक चंद्रकांत वाईरकर (Chandrakant Weirkar) उर्फ चंदु मास्तर (Chandu Master) यांनाही शिवसेने (shivsena) पासून तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वाईरकर कुटुंबियांनी केला आहे.

कोण होते चंदु मास्तर?

  • लालबाग परळमध्ये १९७०-८० च्या दशकात शिवसेना वाढीत चंदु मास्तर यांचे मोलाचे योगदान होते.

  • कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खून खटल्यात चंदु मास्तर प्रमुख आरोपींमध्ये होते.

  • शिवसेनेचा वाघाचा लोगो रेखाटणारे म्हणून चंदु मास्तर यांची ओळख आहे.

  • कम्युनिस्ट आणि गँगस्टर यांना तोंड देत लालबाग व परळमध्ये शिवसेना वाढीस लावताना अनेकदा ते कारागृहात गेले होते.

  • त्याकाळी बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गज नेत्यांचा चंदु मास्तर यांच्या घरी राबता असायचा.

  • लालबाग मध्ये बंडू शिंगरे यांच्या पाठोपाठ परळमध्ये चंदु मास्तर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता.

  • चंदु मास्तर हे निवडणुकीला उभे राहिल्याने तब्बल तीनवेळा परळ मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

काय आहेत वाईरकर कुटुंबांचे आरोप?

  • संजय राऊत चिन्ह या मासिकासाठी मुलाखत घेण्यास सलग तीन दिवस चंदु मास्तर यांच्या परळमधील घरी येत होते.

  • मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर मासिकाची प्रत घेण्यासाठी राऊत आले असताना त्यांनी चंदु मास्तर यांना शिवसेना सोडण्याचा सल्ला दिला होता.

  • तुमच्या कार्याची कदर फक्त शरद पवार हे करू शकतात, असेही राऊत यांनी त्यावेळी चंदु मास्तर यांना सुचवल्याचे चंदु मास्तर यांची पत्नी तृप्ती यांनी केला आहे.

  • त्याचवेळी मास्तरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राऊत यांपासून सावध राहावे असे सांगितल्याचा दावा तृप्ती वाईरकर यांनी केला आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने