Sharad Pawar | Chandrashekhar Bawankule Team Lokshahi
राजकारण

शरद पवारांकडून हे अपेक्षित नव्हते : बावनकुळे

शरद पवार यांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि मविआने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न जात आहे, असा आरोप केला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कधीही संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्व या विषयी चर्चा केली नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

आम्ही कधी ही संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्व या विषयी चर्चा केली नाही. फडणवीस यांनी केवळ शरद पवार यांच्या पक्षातून एका नेत्याने जे मुस्लिम लोकं आणा आणि मतदान काँग्रेसला करा अशी हिंदुत्ववादी विरोधी भूमिका घेतली. मुस्लिम समाजाचे नाव घेऊन हिंदूंविरोधी ही चर्चा आम्ही कधीच केली नाही. हे शरद पवारांकडून अपेक्षित नव्हते त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, असे उत्तर बावनकुळेंनी शरद पवार यांना दिले आहे. त्यांनी मोतीबाग, हिंदू लोकांना डिवचायचा प्रयत्न केला. आम्ही कधीही हिंदुत्ववादी विरुद्ध इतर असा चेहरा तयार केला नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तर, कसबा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुती १०० टक्के जिंकेल या स्थितीत आम्ही आहोत. कसबामधील जनतेवर आम्हाला विश्वास आहे. पुनर्विकास जो इथे थांबला आहे त्याला आता मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे यांचे राज्य सरकार हे डबल इंजिन याकडून आता पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. यावर बोलताना शरद पवार यांनी मतदार यावा असे आवाहन केले तर त्यात काही गैर नाही. तो मतदार नसेल तर हरकत घेणे ठीक आहे. नाहीतर कळत-नकळत त्यास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न आहे. जात, पात, धर्म असे चुकीचे मार्ग प्रसारासाठी भाजपाकडून वापरणे हे नवे नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी