शरद पवार यांनी एका प्रचारसभेत म्हटले आहे की, कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या नादी कोण लागलं आहे. त्यांच्या नादी त्यांचीच लोक लागली आहेत. आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही. आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही. आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे एवढे काम आहे की, आम्ही जनतेची मतं आमच्या कामाने घेऊ शकतो.
यासोबतच ते म्हणाले की, आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचे नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही. त्यांचे काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करतो. त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता मतं कशी देतील. आमच्याकडे विश्वगौरव युगपुरूष नरेंद्र मोदीजी आहेत. आमच्याकडे मोदी सरकारचं काम आहे, महाराष्ट्र सरकारचं काम आहे. जनता आम्हाला साथ देत आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: