राजकारण

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Published by : Siddhi Naringrekar

नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने तीन लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेडची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे.

नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे ही जागा रिकामी झाली. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत आहेत तर यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यावर प्रतिक्रिया देत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, का नाही लढणार? आमची सीट आहे आणि आम्हीच लढणार आहे. एकनाथजी आणि अजितदादांनी त्याला मान्यता दिली आहे. असे बावनकुळे म्हणाले.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार