अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला. यावरुन राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. शरद पवार यांनी भाजपसोबत यावं म्हणून अजितदादांच्या गटाकडून दोन वेळा त्यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते. मात्र शरद पवारांकडून यावर काही निर्णय झाला नाही. यावर अनेक प्रतिक्रिया देखिल आल्या.
यावर आता भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, कधी कोणाच्या पक्षात आम्ही डोकावत नाहीत. आमच्याकडे कोणी आला तर कमळाचा दुपट्टा तयार आहे. कोणीही आलं तर आम्ही पक्ष प्रवेश देण्यासाठी तयार आहोत. फोडाफोडीचा उद्योग राज्यात उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय. 2024 पर्यंत उद्धव ठाकरेंकडे केवळ चारच लोक राहतील. बाकीचे सर्व एकनाथ शिंदेंकडे जातील. पक्ष फोडणे आणि पाठीत खंजीर खुपसणे हे उद्धव ठाकरे यांच्या रक्तात आहे.
तसेच ते म्हणाले की, शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल. असे बावनकुळे म्हणाले.